Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक राजकीय विश्वातील बातमी आली आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चाही सुरु आहे. केंद्रातील एक मंत्री गोपनीय पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यात आले.
जवळपास ते अडीच तास या शहरात राहिले. दरम्यान त्यांनी एका ज्योतिषाची भेट या गोपनीय दौऱ्यादरम्यान घेतली असल्याची माहिती समजली आहे. हे मंत्री म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी असल्याची माहिती समजली आहे.

त्यांनी शनिवारी श्रीरामपूर शहराचा दौरा केला. ते येथे एका ज्योतिषाकडे आले असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत त्यांचे काही निकटवर्तीय लोक होते. हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ते थेट श्रीरामपूर शहरात दाखल झाले.
श्रीरामपूर शहरातील एका ठिकाणच्या परिसरात एक ज्योतिषी राहतात. त्यांच्याकडे सतत सेलिब्रिटी, राजकीय नेते लोक येत असतात. मंत्री कुमारस्वामी यांनीही त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
अचानकपणे या परिसरामध्ये दुपारी शासकीय वाहनांचा ताफा येऊन धडकला. त्यामुळे कोणीतरी विशेष व्यक्ती आल्याची जाणीव झाली. या दौऱ्याच्या दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त देखील तेथे असल्याचे नागरिकांना दिसले.
नाशिक व नगर जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा सुरक्षेसाठी यावेळी होता. एका मीडियाने पोलिसांशी संपर्क केल्यानंतर त्यांना या मंत्र्यांच्या दौऱ्याविषयी माहिती मिळाली असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री कुमारस्वामी हे दोन ते अडीच तास शहरात होते. ते ज्योतिष यांच्या घरी आले होते अशी चर्चा सध्या रंगलेली असल्याने त्यांचा दौर्याविषयी विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.