Ahmednagar News : शेवगाव पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ पकडला आहे. हा तांदूळ तालुक्यातीलच एका स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे समजते.
मात्र हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील की लाभार्थ्यांनी विकलेला, याची पडताळणी सुरू असून याबाबत सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती सध्या मिळाली आहे.
स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीला जात असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली होती.
त्यांनी बुधवार दि. ३ रोजी दुपारी आखेगाव रस्त्यावर एका क्रमाकांचा टेम्पो शेवगाव पोलिसांनी पकडला. या टेम्पोत गोण्यात भरलेला तांदूळ आढळल्याने तो ताब्यात घेण्यात आला. मात्र हा पकडलेला तांदूळ धान्य दुकानातील की लाभार्थ्यांनी विकलेला याबाबत पडताळणी सुरु आहे.
पोलिसांनी पकडलेल्या तांदुळाबाबत पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची मी ताहिती समजली होती. दरम्यान, शासनाकडून रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य वाटप होत आहे.
लाभार्थी धान्य घेऊन नंतर त्याची विक्री करतात. त्यामुळे लाभार्थ्यांकडून घेतलेले निकृष्ट धान्य असल्याने त्याची विक्री करतात. लाभार्थ्यांकडून घेतलेले हे तांदूळ असावेत, असा तूर्त अंदाज काढण्यात येत असला तरी याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येणारे गहू व तांदूळ हे धान्य अनेकवेळा निकृष्ट दर्जाचे असते. यामुळे हे धान्य खाण्यायोग्य नसल्याने लाभार्थ्यांकडून याची विक्र केली जाते. हे धान्य पशुपक्षांसाठी अनेकजन विकत घेतात.
यामुळे काहीजन दारोदार फिरुन असे धान्य विकत घेतात व ते मोठ्या शहरात किंवा एखाद्या कंपनीला भरडा करण्यासाठी पाठविले जाते. यामुळे स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य दर्जेदार असावे, तरच ते खाण्यायोग्य राहील. तरी यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
या आधीदेखील अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ अनेकदा ब्लॅकने विकण्यासाठी बाहेर पाठ्वल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अनेकदा गरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रकार समाजविघातक प्रवृत्तीचे लोक करताना आढळतात. पोलिसांनी यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.