नगरच्या धर्मादाय उपायुक्तांचे देखील अपंग प्रमाणपत्र बनावट ? खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? मोठी खळबळ

बनावट अपंग प्रमाणपत्रावरून वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पुजा खेडकर प्रकरण गाजत असताना नगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती उषा पाटील यांचेही बनावट अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : बनावट अपंग प्रमाणपत्रावरून वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पुजा खेडकर प्रकरण गाजत असताना नगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती उषा पाटील यांचेही बनावट अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे.

याबाबत याच विभागात कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर आंधळे या कनिष्ठ कर्मचाऱ्याने थेट राज्य शासनाकडे तक्रारी नोंदवली आहे. श्रीमती पाटील यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र मिळविले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सेवा समाप्त करण्याची मागणी आंधळे यांनी केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीमती पाटील या सांगली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांच्या डोळ्याचे अपंगत्व हे ४० टक्के पेक्षा खूप कमी असताना, डोळ्याने अपंग असल्याचे दाखवले असून, त्यांनी सांगली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून खोटे व बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळाले आहे.

बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे त्यांची अपंग प्रवर्गातून प्रथम सहाय्यक धर्मादाय आयुक्त यापदी सरळ सेवेने नियुक्ती झाली होती. श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांची अपंग प्रवर्गातून धर्मादाय उपआयुक्त यापदी पदोन्नती झाली आहे.

सरळ सेवेने नियुक्ती होतांना तसेच पदोन्नतीसाठी अशा दोन्हीसाठी श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांनी अपंग प्रवर्गाचा खोट्या व बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत लाभ घेतलेला आहे.

शासनाची फसवणूक केलेली आहे. अपंगत्व तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शन सूचना महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आहेत. सांगली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वैद्यकिय मंडळाने या मार्गदर्शन सूचनांचे पालन केले नाही व श्रीमती उषा सुनिल पाटील यांना प्रमाणपत्र दिलेले आहे.

श्रीमती उषा सुनिल पाटील यांनी खोटे व बनावट अपंग प्रमाणपत्र प्राप्त करुन शासकीय नोकरीसाठी त्याचा गैरवापर केलेला आहे. श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांचे डोळ्याचे अपंगत्व ४० टक्केपेक्षा कमी असून त्यांनी खोटे व बनावट अपंग प्रमाणपत्र प्राप्त करुन

शासकीय नोकरीसाठी त्याचा वापर केलेला असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करतानाच पाटील यांची सेवा समाप्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe