अहमदनगर बातम्या

व्हायरल इंफेक्शनचा ताप लवकर उतरेना ! नगर शहरासह ग्रामीण भागात प्रचंड रुग्ण, ओपीडी फुल्ल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विषम वातावरण व साचलेल्या पाण्यात झालेल्या डासांमुळे सध्या नगर शहरसह ग्रामीण भागात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डॉक्टरांचे क्लिनिक फुल्ल झाले आहेत.

तर या व्हायरल इंफेक्शनचा ताप लवकर उतरतं नसल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून शहरात घरोघरी सर्दी, खोकला आणि तापीचे रुग्ण आढळून येत आहेत.

यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर व्हायरल इन्फेक्शनचे डेंग्यू, चिकनगुणिया, टायफाईड, गोचीडताप या आजारांचेमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या डेंग्यू, चिकनगुनिया, टायफाईड, गोचीडताप अशा रुग्णांची नोंद होत आहे. या व्यतिरिक्त सर्दी, खोकला आणि तापीच्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयांमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुग्णांची मोठी गर्दी दिसत आहे.

घर व परिसरात पडलेले भंगार, मोकळी भांडी, खड्डे, घरातील कुंड्या, नारळाच्या कवट्या, टायर यामध्ये पाणी साचते. हिच ठिकाणे डासांची उत्पत्तीस्थाने बनत आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात कमी अधिक स्वरूपात पाऊस होत आहे.

त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. हिवतापाचा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते. या डासांनी माणसाला डंख मारल्यास हिवताप व डेंग्यूची लागण होते.

दरम्यान ग्रामीण भागात काही ठिकाणी व्हायरल इंफेक्शन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये येणार ताप हा लवकर व सहजासहजी उतरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांचे क्लिनिक फुल्ल झाले आहेत.

तर या व्हायरल इंफेक्शनचा ताप लवकर उतरतं नसल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office