अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : विजेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या जीवाला लागला घोर !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राज्यातील वीज वितरण कंपनीच्या वीजदर वाढीस मंजुरी मिळाल्यामुळे आता सर्वसामान्याना चांगलाच शॉक बसत आहे. पूर्वी घरगुती वीजबिल शंभर ते दीडशे रुपये आकारले जात होते, आता तर अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही जास्त येत असल्याने सर्वसामान्य माणसांनी ते कसे भरावे, असा प्रश्न पडला आहे.

त्यात परत राज्यात प्रीपेड वीज मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइल सारखे बॅलेन्स संपल्यानंतर लगेच तुमची लीगत देखील आता बंद पडेल. त्यामुळे अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता सरकार व महावितरण कंपनी चांगलाच शॉक देत आहे.

खासगीकरणानंतर दिवसें दिवस वीजदर वाढतच आहे, महागाईच्या युगात विविध आवश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्यातच महावितरणच्या मनमानी कारभारामुळे वीजदर आवाक्याच्या बाहेर गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, राज्य सरकारने याचा विचार करून वीज दरवाढ कमी करावी कारण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजदर सर्वात जास्त आहेत.

राज्यात वीज वितरण कंपनीने चालू आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून वीजेची दरवाढ केल्यामुळे ग्राहकांना चांगलाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य मजूर, शेतकरी यांना वीजबिल परवडत नसल्याने त्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. तर काहींची कमाई वीज बिल भरण्यातच जात आहे. त्यामुळे शासनाने वीज बिल कमी करावे, अशी मागणी होत आहे.

वीज वितरणला तोटा होत आहे, याचा गाजावाजा महावितरण करत आहे. वितरण कंपनीतर्फे वीजेची सेवा देताना ज्या बाबींची दखल घ्यायला हवी, ती घेतली जात नसल्यामुळे त्याचा तोटा वाढतोच. त्यापैकी वीजेची होणाऱ्या भरमसाठ चोरीवर उपाय केला जात नाही. दिवसेंदिवस वीजेचा लपंडाव सुरुच आहे.

सध्या पावसाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे या दिवसात वादळ, वारे यामुळे झाडे कोसळून उसन होत असतात. परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वी वाकलेले विजेचे खांब सरळ करणे, लटकत्या ताराची दुरूस्ती करणे, आदी कामे करणे गरजेचे असतात. मात्र अशी कोणतीच कामे केली जात नाहीत परिमाणी थोडा जरी पाऊस झाला तरी वीज पुरवठा खंडित होतो.

त्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते, मात्र याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते. पावसाळ्याच्या सुरूवातीला काही दिवस वारा, गारा, अवकाळी पाऊस, झाडे तुटणे, तारा तुटणे, यामुळे उद्भवलेल्या समस्या लवकर सुरळीत होत नाहीत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी लोंबकळणाऱ्या तारा, डीपी यांची दुरुस्ती, आदी कामे वेळेत पूर्ण करून वीज वारंवार खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Ahmednagarlive24 Office