अहमदनगर बातम्या

‘मर्डरच्या आरोपातील दोषी व्यक्तीचे नावं उपबाजार समितीस’ , महाविकास आघाडीकडून तीव्र पडसाद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  नुकतेच नगर येथील नेप्ती उपबाजार समितीचे नामकरण झाले. यावरून महाविकास आघाडीने निषेध व्यक्त केला आहे. खूनाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीच नाव देण्यात आलंय.

हा निर्णय न्याय, नैतिकता आणि कायद्याच्या तत्वांचा सरळ अवमान असल्याचं महाविकास आघाडीने म्हटलंय. तसेच नामकरण निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. सार्वजनिक संस्थेस दोषी गुन्हेगाराचे नाव देणे केवळ अमान्य असल्याचं महाविकास आघाडीने म्हटलं आहे.

हे समाजासाठी धोकादायक उदाहरण ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी या उद्घाटनात भाग घेतलाय. समाजात चुकीचा मॅसेज त्यांच्या या कृतीने जात असल्याचे सांगत या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करा अशी मागणी महाविकास आघाडीने प्रशासनाला केली आहे.

समाजात सकारात्मक योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव सार्वजनिक संस्थांना दिले पाहिजे. प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक किंवा स्थानिक व्यक्तिमत्वाच्या नावाने किंवा समाजाच्या

हितासाठी नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या एखाद्याच्या नावाने नेप्ती उपबाजार समितीला ओळख द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.

नागरिक, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांनी देखील या मानहानीकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी एकत्रित यावं असही आवाहन यावेळी करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office