अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : पत्र्याच्या शेडमध्ये ऑफिस थाटले अन ३०० कोटी घेऊन फरार झाले ! जास्त व्याजाच्या नावाखाली अहमदनगरकरांची फसवणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : परताव्याच्या अमिषापोटी शेतमजूर, वीटमजूर, शेतकरी, शिक्षक अशा अनेकांनी ‘आयुष्यभराचे भांडवल या शेअर मार्केटमध्ये गुंतवले. शेअर बाजारातील गुंतवणूक दुप्पट करून किंवा महिनाभरात मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अनेकांची फसवणूक झाली आहे.

शेअर्स मार्केटचा जेमतेम अभ्यास करून त्यासाठी सावज शोधून त्याच्यावर डाव टाकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा रंगली आहे. ट्रेडर्स गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाले आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तालुक्यातील व्यवहारही ठप्प झाले आहेत.

या तालुक्यातील काही भागांची दुष्काळाने दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची अवस्था जेमतेम असून, काही महिन्यांपासून शेअर बाजाराच्या नावाखाली या भागात ट्रेडर्सने धुमाकूळ घातलाय.

गुंतवणूकदाराना परताव्याची ऑफर दाखवून या ट्रेडर्सनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेत दरमहा ७ ते २० टक्के परतावा देऊ असे सांगितले होते. काही महिने रिटर्न्स दिल्यानंतर हे ट्रेडर्स गुंतवणुकीची रक्कम घेऊन पसार झाले आहेत.

शेअर बाजाराची माहिती नसताना परताव्याच्या आशेने नागरिक गुंतवणुकीसाठी पुढे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी या फंडाचा वापर सुरू केला. या गुंतवणूक दारांनी जास्त पैसे मिळतायेत म्हणून आपल्या काही नातेवाईक, मित्रांनाही यात गुंतवणूक करण्यास सांगितले.

त्यामुळे यात अनेकांनी लाखो रुपये गुंतवले. यामुळे गेल्या काही महिन्यांत शेवगाव तालुक्यात २८० ट्रेडर्स उदयास आले होते. यामुळे अधिक परतावा मिळण्याच्या लोभापोटी अनेकांनी आपले जीवन उद्ध्वस्त केले आहे.

Ahmednagarlive24 Office