Ahmednagar News : अहमदनगरमधील पिंपळस गावच्या सरपंच यांच्या पतीकडून वाढदिवस साजरा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची हातून घडली आहे. नितीन अशोक वाघमारे, रा. पिंपळस यांनी याबाबत राहाता पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझा शनिवारी वाढदिवस असल्याने पिंपळस गावातील माझे मित्र सुनील लोंढे व इतर मित्रांनी मला वाढदिवस साजरा करण्यासाठी सुनील लोंढे यांच्या घरासमोर शनिवारी रात्री बोलवले असता मी त्या ठिकाणी रात्री वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो. तिथे आमच्या गावातील राजेंद्र कदम, सागर कापसे, दिगंबर तांबे, सागर घोगळ व इतर मित्र परिवार माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित होते.
आम्ही लोंढे यांच्या घरासमोर वाढदिवस साजरा करत असताना तिथे आमच्या गावातील सरपंच यांचे पती चार चाकी गाडी मधून तिथे आले व मला म्हणाले की तू येथे वाढदिवस साजरा करू नको, तुझ्या घरी जाऊन वाढदिवस साजरा कर. असे म्हणाले असता मी त्यांना म्हणालो की माझे गावातील मित्र माझा वाढदिवस साजरा करणार आहेत. वाढदिवस साजरा झाला की आम्ही येथून निघून जाणार आहोत असे म्हणालो असता दत्तात्रेय घोगळ यांनी दारूच्या नशेत आमची त्यांच्या मोबाईलमध्ये शूटिंग काढण्यास सुरुवात केली.
आम्ही त्यांना म्हणालो तू आमची शूटिंग काढू नको असे म्हटलो असता तिथे माझी बाचाबाची झाल्याने दत्तात्रेय सूर्यभान घोगळ, त्यांची पत्नी सरपंच नंदाताई घोगळ, सार्थक घोगळ व मंगेश गमे हे तिथे आले व त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दत्तात्रेय घोगळ, मंगेश गमे व सार्थक घोगळ यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व माझा मित्र राजेंद्र कदम
यास देखील दत्तात्रेय घोगळ यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तिथे दत्तात्रेय घोगळ व त्यांची पत्नी नंदाताई घोगळ यांनी राजेंद्र कदम यांची पत्नी अश्विनी कदम हिला शिवीगाळ करून मारहाण केली असून तुम्ही परत गावात व ग्रामपंचायत मध्ये दिसले तर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी दत्तात्रेय घोगळ, नंदाताई घोगळ, सार्थक घोगळ, धर्मेश बानगुडे व मंगेश गमे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.