Ahmednagar News : अहमदनगरमधील तापमान दोन अंशांनी घटले ! उद्यापासून अवकाळी पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तापमान जवळपास ४१ अंशावर गेले होते. त्यामुळे उष्णतेने अगदी काहिली झाली होती. परंतु आता या तापमानात काल बुधवारी २ अंशांनी घट झाल्याने तापमान ३९ अंश सेल्शियसवर आले होते

. दरम्यान आता उद्या अर्थात शुक्रवारपासून (१० मे) पुढील तीन दिवस शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र, अजूनही उन्हाचा तडाखा कायम असल्याने उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नगर शहर व परिसरात मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढला होता.

वाढत गेला उन्हाचा पारा
मार्चच्या पहिल्या आठवड्यात ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते, मात्र दुसऱ्या आठवड्यापासून त्यात वाढ होऊ लागली. एप्रिलमध्ये ३९.८२ अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा गेला होता. मे महिना सुरू होताच तापमानाचा पारा आणखी वाढू लागला.

गेल्या तीन दिवसांपासून शहराचे तापमान ४१ अंशावर होते. रविवार, सोमवार व मंगळवारी शहराचे तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. बुधवारी शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअस होते. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत बुधवारी तापमान दोन अंशांनी कमी झाले,

तरी उकाडा कायम होता. दरम्यान, १० मेपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

अहमदनगरमध्ये काही भागात अवकाळी पाऊस..
अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण परिसरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. साधारण २० मिनिटे वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यामुळे काही वेळातच सगळीकडे पाणी पाणी झाले.

वादळी वाऱ्यामुळे कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला होता. सध्या शेतात कांदा काढून ठेवला आहे. हा कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.