अहमदनगर बातम्या

‘ते’ तिघे, गळ्याला चाकू लावून महिलेसोबत केले धक्कादायक कृत्य, अहमदनगर मधील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील एक महिला राहुरी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना दोन महिलांनी हात धरून एका भामट्याने गळ्याला चाकू लावत तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत काढून लांबविल्याची घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी घडली.

हिराबाई म्हसू कल्हापुरे (वय ६०, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर) ऑगस्ट २०२४ नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथे कामानिमित्त गेल्या होत्या. दुपारी त्या श्रीरामपूरला परत जाण्यासाठी राहुरी बसस्थानकात थांबल्या होत्या.

काही वेळात अहमदनगर- श्रीरामपूर एसटी बस आली. हिराबाई बसमध्ये चढत असताना वरील प्रकार घडला. त्यानंतर सदर भामटा व महिला पसार झाल्या. हिराबाई कल्हापुरे यांनी आरडाओरडा केला, परंतु ते पसार झाले.

याबाबत कल्हापुरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून लाखो लांबवले
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून झोपलेल्या पती पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध करत घरातील आठ तोळे वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री एकरूखे शिवारात पडली.

याबाबत राहाता पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रविवार दि.११ ऑगस्टच्या रात्री दीड ते पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचन रुमचा कडी कोयंडा तोडून एक लाख चाळीस हजार रुपयाचे गंठन,

एक लाख चाळीस हजार रुपयांची सोन्याची साखळी व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ३ लाख २९ हजार रुपयांचा माल चोरून नेला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office