अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील ‘त्या’ लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या, हनी ट्रॅपचा बळी गेल्याची चर्चा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील वाशेरे येथील एक तरुण डीजे चालक हनीट्रॅपच्या प्रकरणातील महिलेसोबतच्या प्रेम प्रकरणात गुंतत गेल्याने त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. ही घटना अकोले शहरात शेकईवाडी येथील संकेत लॉजिंगमध्ये घडली.

शेखर अशोक गजे असे या युवकाचे नाव आहे. संकेत लॉजमध्ये आत्महत्या त्याने केली. दरम्यान हा हनी ट्रॅपचा बळी असल्याची चर्चा शहरात होती. हनीट्रॅपच्या प्रकरणातील महिलेसोबतच्या प्रेम प्रकरणात आत्महत्याग्रस्त डीजे चालक शेखर अशोक गजे हा तरुण अकोले तालुक्यातील वाशेरे येथील मुळ रहिवासी आहे.

तालुक्यातील वाशेरे येथील या तरुणाने अकोले शहरातील शेकईवाडी येथील संकेत लॉजमध्ये गुरुवारी (५ जुलै) रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. हा तरुण हनी ट्रॅपचा बळी असल्याची चर्चा आहे. एका महिलेने शेखर गजे यास आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्याच्याकडून तीने लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे.

ही महिला शेखर गजे यास अनेक दिवसांपासून धमक्या देऊन त्याच्याकडून पैसे उकळत होती. मात्र शेखर कर्जबाजारी झाल्याने नंतरनंतर तिला पैसे देऊ शकत नव्हता. या महिलेच्या जाचाला कंटाळून शेकईवाडी येथील संकेत लॉजिंगवर त्याने आत्महत्या केली.

याप्रकरणी मृत शेखरची पत्नी शीतल हिच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून हनीट्रॅप संदर्भात याआधी देखील अनेक प्रकरणे उजेडात आलेले आहेत.

अनेकांना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची कामे केली जातात. अनेक लोक इज्जतीच्या भीतीने समोर येत नाहीत किंवा दाखल करत नाहीत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या महिलांचे फागते अशी चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office