अहमदनगर बातम्या

चोरट्यांचा धुमाकूळ सुरु ! एकाच रात्रीत तीन पतसंस्था, किराणा दुकान, गॅस एजन्सीत चोरी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सायंकाळी १० नंतर चोरट्यांचे काहूर सुरु होते.

नगर तालुक्यातिल काही घटना ताजा असतानाच आता शेवगाव तालुक्यामधून मोठी घटना समोर आली आहे. चोरटयांनी एकाच रात्री तीन पतसंस्था, किराणा दुकान, गॅस एजन्सीत चोरी करत धुमाकूळ घातला आहे.

चोरटयांनी शेवगाव तालुक्यातील वाघोली, ढोरजळगाव, चापडगाव येथील पतसंस्था, तर वडुले येथील किराणा दुकान, बोधेगाव येथील गॅस एजन्सीचे कार्यालय फोडले. ही घटना सोमवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास घडली. सोमवारी पहाटेच्या सुमारास वाघोली येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन शाखेच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरे,

सायरन आदींच्या केबल कट करून सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी केली. त्यांनतर लोखंडी शटर तोडून आत प्रवेश करत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो असफल ठरला. शाखा व्यवस्थापकाच्या कक्षातील कपाट उघडून उचकपाचक केली. सीसीटीव्हीसाठी वापरण्यात येणारे डीव्हीआर हे यंत्र चोरून नेले. वडुले येथील महादेव आव्हाड यांचे किराणा दुकान फोडून रोख रक्कम, सुकामेवा चोरून नेला.

ढोरजळगाव येथील वृद्धेश्वर अर्बन संस्थेचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून शटर फोडण्याचा प्रयत्न केला. चापडगाव येथील साई अर्बन पतसंस्था फोडण्याचा प्रयत्न करत असताना, सायरन वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. तसेच, बोधेगाव येथील शंकर शिंदे यांच्या रामकृष्ण गॅस एजन्सी कार्यालयाची काच फोडून रोख रक्कम चोरून पसार झाले.

ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना देखील याठिकाणी बोलवण्यात आले होते. या प्ररकणी शेवगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

नगर तालुक्यातही धुमाकूळ
नगर तालुक्यात ग्रामीण भागात देखील चोरटयांनी धुमाकूळ घातलेला आहे. सोनेवाडी (चास) गावातही दोन ते तीन दिवसांपासून चोरटे येत असून चोरीचा प्रयत्न करत आहेत. काही चोर सीसीटीव्हीतही कैद झाल्याची माहिती समजली आहे.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office