अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : ‘दुष्काळात तेरावा’ : ग्रामपंचायतचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच साहित्य केले लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सर्वसामान्य नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या व ग्रामपंचायतच्या मालकीचा असलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच अज्ञात चोरटयांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्या आहेत. ही घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खूर्द ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील सौर ऊर्जा प्रकल्पात घडली.

एकीकडे शासनाच्या योजना एक तर सहजासहजी मंजूर होत नाही, मंजूर झाल्या तर कामही अतिशय धीम्या गतीने चालते. त्यामुळे शासनाच्या योजनांबद्दल लोक नाखूष असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

मात्र दुसरीकडे शासनाने मोठा खर्च करून नागरिकांसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार होता; परंतु तो सुरू होण्याआधीच या प्रकल्पाच्या साहित्याची चोरी झाली आहे. त्यामुळे ‘ऐन दुष्काळात तेरावा’ या म्हणीप्रमाणे येथील ग्रामस्थांची अवस्था झाली आहे.

खडांबे खुर्द ग्रामपंचायतने सुमारे दोन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर जलजीवन योजनेच्या संलग्नित असलेला २० सौर ऊर्जेच्या प्लेटा असलेला मोठा प्रकल्प उभारला होता. याच प्रकल्पाद्वारे पारंपरिक पद्धतीने वीजनिर्मिती करून या सब वेलमधील साठविलेल्या पाण्याचा उपसा करून पाणी मुख्य जल कुंभात सोडण्याची व्यवस्था केली होती.

त्याकरिता आवश्यक वीज निर्मिती याच सौर ऊर्जा प्रकल्पातून होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र
ग्रामपंचायत मालकीच्या २० सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटांपैकी १० प्लेटा चार दिवसांपूर्वी चोरीला जाण्याची घटना घडली आहे. या चोरीला गेलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० हजार इतकी आहे.

या प्रकल्पाचे कामकाज हे पूर्ण झालेले होते. वीज जोडणी व्यवस्थाही पूर्ण झालेली होती; परंतु हा प्रकल्प अजून सुरूच झालेला नव्हता. तरीही बसविण्यात आलेल्या सौर प्रकल्पाच्या प्लेटा चोरी जाण्याचा प्रकार घडला असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रकल्पातून होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली होती.

या घटनेबाबत ग्रामविकास अधिकारी शिवाजी लहानू ढगे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान दोन वर्षापूर्वी खडांबे येथील स्मशानभूमीतील पाळणा चोरीला गेला होता. त्याचाही अजून तपास लागलेला नाही.

Ahmednagarlive24 Office