Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हा’ ब्रिटिशकालीन दगडी पूल झाला दीडशे वर्षांचा, त्यावेळी १ लाखांचा खर्च, पुलावरील बस पाहण्यासाठी जमलेली मोठी गर्दी..

Ahmednagarlive24 office
Published:
dagadi pool

 

Ahmednagar News : ब्रिटिशकालीन अनेक वास्तूंच्या पाऊलखुणा आजही अहमदनगर जिल्ह्यात आहेत. तसेच काही वास्तू आजही अगदी सुस्थितीत आहेत. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील जुनी जिल्हा परिषद असेल किंवा नगरमधील लोखंडीपूल असेल आजही उभे आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे देखील एक सतरा कमानींचा पूल आहे. हा दगडी पूल १५० वर्षांचा झाला आहे. त्यावेळी ब्रिटिशकाळात याचे बांधकाम करण्यास १ लाख चार हजार रुपये खर्च आला होता.

विशेष म्हणजे १ जून १९४८ साली पहिली एसटी बस अहमदनगर ते पुणे तीस प्रवासी क्षमता असलेली बस या १७ कमानीच्या पुलावरून पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी या पुलावर अनेकांनी बस पाहण्यासाठी गर्दी केली असल्याचे काही जुणेजाणेते सांगतात.

ब्रिटिशकालीन दळणवळणासाठी घोडनदीवर बांधण्यात आलेला दगडी पूल आजही सुस्थितीत पहायला मिळत आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला पूल स्वातंत्र्यासह अनेक घटनांचा साक्षीदार आहे. दीडशे वर्षांनंतरही या पुलाला कुठल्याही प्रकारची पडझड झालेली नाही.

एकूण सतरा कमानी पुलाला आहेत. संपूर्ण दगडी, तसेच नक्षीदार बांधकाम या पुलाचे आहे. पूर्वी चिंचणी धरण नसल्याने बारा महिने नदी वाहत असे. इंग्रजांचे वास्तव्य हे शिरूर आणि पारनेर आणि अहमदनगर येथे होते.

दळणवळण करण्यासाठी पुण्याकडे जाताना घोडनदीचा अडसर होता. नदीवर एकही धरण नव्हते आणि फार शेती विकसित नसल्याने घोडनदी बारा महिने वहात असायची. यामुळे शंभर वर्षांपूर्वी या पुलाची बांधणी केलली आहे.

थोडक्यात इतिहास
पुलाचे बांधकाम जानेवारी १८६६ साली सुरू झाले होते व ते डिसेंबर १८६७ साली बांधकाम पूर्ण झाले. यासाठी एकूण बांधकाम खर्च १ लाख चार हजार रुपये आला. या पुलाची लांबी २४० मीटर असून रुंदी १०.४० मीटर आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला फूटपाथ देखील आहे.