Ahmednagar News : ‘या’ गावरान फळाला मिळतोय सोन्याचा भाव ! एक किलोसाठी मोजावे लागतात इतके पैसे

Pragati
Published:

Ahmednagar News : काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तसेच अनेक आजारांवर देखील ते परिणामकारक आहे. एरवी भरपूर व फुकट मिळणाऱ्या जांभळाला मात्र सोन्याचा दर मिळतोय. सध्या जांभूळ चक्क सफरचंदापेक्षा महाग झाले आहे.

निसर्गाचा लहरीपणा तसेच दरवर्षी कमी होत असलेला पाऊस वाढलेले तापमान या बदलत्या हवामानाचा जांभळावर देखील परिणाम झाला असून जांभळाची आवक घटत चालली आहे . दरवर्षी पावसाळा सुरू होत असताना बाजारात‎ रसरशीत जांभूळ पाहायला‎ मिळतात. सध्या शहरातील मार्केटमध्ये‎ जांभूळ दाखल झाले आहेत. मात्र या‎ रसरशीत जांभळांना चांगलाच भाव‎ मिळाला आहे.

मधुमेह रुग्णांसाठी‎ गुणकारी आणि चवीला आंबट गोड‎ असलेल्या जांभळाची बाजारपेठेत यंदा‎ आवक जास्त आणि मागणीही जास्त‎ आहे. मात्र जांभळीच्या झाडांच्या लाकडाचा विशेष उपयोग होत नसल्याने झाडांची संख्या अत्यंत कमी असते. त्यामुळे या फळाला चांगला भाव मिळत आहे.

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी जांभळाचे सेवन करणे‎ हितकारक मानले जाते. मात्र भाव‎ आवाक्याबाहेर असल्याने सामान्यांना ते‎ खरेदी करणे परवडत नाही, असे चित्र‎ सध्या दिसून येत आहे. जसा जसा‎ पाऊस पडेल, तसं तसे पुढील काही‎ दिवसांत जांभाळाचे भाव कमी होतील.‎ अहमदनगर बाजार समितीत जांभळाला ७००० ते १७००० रुपये किंटल असे भाव मिळाले. तर किरकोळ २०० च्या पुढे प्रति किलो असे जांभूळ विकले जात आहे.

जांभूळ हे शरीरातील शुगर नियंत्रणात‎ ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे‎ जांभळाच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात जांभुळ खरेदी‎ करण्यासाठी नागरिक येत असतात. तसेच,‎ जांभूळ हे त्वचेसाठीदेखील गुणकारी‎ म्हणून वापरलं जाते. जांभूळ खाल्ल्यानं दात आणि हिरड्या मजबूत होतात.

ॠतुबदलाचे आजार होऊ नयेत यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते.जांभळाच्या बिया‎ मुरूम आणि पिंपल्स दूर करण्यासाठी‎ उपयोगी आहेत. या जांभळाच्या‎ पानांमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म‎ असल्याने याचा शरीराला फायदा होतो.

जंगलातील जांभळांच्या झाडांमुळे कातकरी, डोंगराळ भागातील लोकांना जांभुळे विकून, लाकडे विकून उपजीवीकेसाठी हातभार लागतो. पण आजकाल जंगलतोडीमुळे जंगल-डोंगरांवर पडणारी ही मायेची सावली पोरकी होत चालली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News