Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हा’ प्रमुख जिल्हामार्ग अचानक बंद ! पूर्वकल्पना नसल्याने वाहतुकीची कोंडी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरीसह पंचक्रोशीतील गावांना जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या वांबोरी ते शेंडी हा प्रमुख जिल्हामार्ग शनिवारी दुपारी अचानक बंद करण्यात आला. घाट रस्त्याच्या दुरूस्तीचे कारण देत हा रस्ता बंद करण्यात आला होता.

विशेष म्हणजे बांधकाम विभागाने याबाबत कोणताही अधिकृत फलक न लावता वांबोरीहून नगरकडे जाणारी वाहने एका कामगारामार्फत पांढरीपूलमार्गे वळवण्यात आली. रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती नसल्याने अनेकांना घाटात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

वांबोरी मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने नगर ते वांबोरी मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. शेंडीजवळ छत्रपतीसंभाजीनगर-अहम दनगर या महामार्गाला हा प्रमुख जिल्हामार्ग जोडतो. याच मार्गात असलेल्या वांबोरी घाटात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.

काम सुरू असल्याबाबत कुठेही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार मागील काही दिवसांत या रस्त्यावर आलेल्या खडीमुळे घसरून पडत आहेत.

शनिवारी बाराच्या सुमारास वांबोरी येथील शासकीय विश्रामगृहाजवळ ठेकादाराकडूनच एक कामगार उभा करण्यात आला होता. घाटात रस्त्याचे काम सुरू असल्याचे कारण देऊन चार चाकी वाहने पांढरीपूलमार्गे वळवण्यात आली.

त्यानंतर याच कामगाराने रस्त्यावर दगडही ठेवले. अधिकृत फलक नव्हता. तसेच वांबोरीसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांना घाट कोणत्या कालावधीत बंद राहील व केंव्हा सुरू होईल, याची कोणतीही कल्पना नसल्याने,

वाहतूक व्यवस्थाच विस्कळीत झाल्याचे चित्र होते. या प्रकारामुळे वाहनचालकांमधून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली सायंकाळी सायंकाळी पुन्हा घाटरस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.