Ahmednagar News : अंतराळात जसे अनेक तारे व ग्रह आहेत तसेच धूमकेतू देखील आहेत. अंतराळातील असाच एक धूमकेतू पृथ्वीच्या अतिशय जवळून जात असून त्याला हॉनेंड धूमकेतू म्हणतात, ज्याच्यावर सातत्याने स्फोट होत असल्याने या स्फोटांच्या मालिकेसाठी हॉर्नेड धूमकेतून प्रसिद्ध आहे.
त्याच्या विशिष्ट आकारामुळे त्याला डेव्हिल धूमकेतू किंवा राक्षसी धूमकेतू असेही म्हणतात. हा राक्षसी धूमकेतू मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उत्तर गोलार्धातील लोकांना दिसत नाही. परंतु दक्षिण गोलार्धातील लोक याला दुर्बिणीद्वारे पाहू शकतात. या धूमकेतूची तुलना स्टार वॉर्स चित्रपटातील मिलेनियम फाल्कन अंतराळ यानाशी करण्यात आली आहे.
सध्या दक्षिण गोलार्धातून दुर्बिणीद्वारे दिसू शकणारे हे खगोलीय पिंड हॅलीच्या धूमकेतूसारखे असून अंदाजे दर ७१ वर्षांनी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करीत असल्याने त्याला आयुष्यात एकदाच जवळून पाहण्याची संधी मिळते. हा धूमकेतू पुढील अनेक दशकांपर्यंत पृथ्वीजवळून जाणार नाही.
या धूमकेतूला अधिकृतपणे १२ पी/पोंस-ब्रुक्स असे नाव देण्यात आले असून २१ एप्रिल रोजी तो सूर्याच्या सर्वात जवळ म्हणजेच सूर्यापासून ११.९७ कोटी किमीवर आला होता. हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार असला तरीही त्याचे अंतर पृथ्वीपासून २३ कोटी किमी असणार आहे.
त्यामुळे त्याच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एप्रिलच्या उत्तरार्धात धूमकेतूची चमक शिगेला पोहोचली होती आणि तीन ते चार आठवड्यांपासून ती सातत्याने कमी होत आहे, ‘अॅरिझोनामधील लॉवेल वेधशाळेतील खगोलशास्त्रज्ञ डॉ. डेव्ह श्लेचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉवेल येथील पोस्टडॉक्टरल सहयोगी खगोलशास्त्रज्ञ डॉ. टेडी कॅरेटा म्हणाले की, १९५२ पासून विषुववृत्ताच्या खाली असलेल्या लोकांना ते पाहण्यासाठी येणारे आठवडे आणि महिने ही पहिली चांगली संधी आहे.
डेव्हिल धूमकेतूचा शोध जीन-लुईस पॉन्स आणि विल्यम रॉबर्ट बुक्स यांनी लावला होता. १८१२ मध्ये पॉन्स आणि १८८३ मध्ये ब्रुक्स यांनी याचा शोध लावला होता. या धूमकेतूने हजारो वर्षांत सूर्याभोवती अनेक फेऱ्या केल्या आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, त्याचा व्यास १० ते २० किलोमीटरच्या
दरम्यान असेल.