गाव पेटवून देण्याची धमकी, तलवार, गावठी कट्टा घेऊन ‘राडा’, अहमदनगरमधील प्रकार

ग्रामस्थांना जिवे मारण्याची धमकी देत गाव पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. हातात लाठ्या-काठ्या, तलवार, गावठी कट्टा घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथे घडला.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : ग्रामस्थांना जिवे मारण्याची धमकी देत गाव पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. हातात लाठ्या-काठ्या, तलवार, गावठी कट्टा घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथे घडला.

हा प्रकार रविवारी (दि.१४) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी रवी डावखर (रा. आळेफाटा, ता. जुन्नर), तेजस रेपाळे, विशाल गोंधे, प्रदीप आवारी, ओमकार वाकचौरे, अभिजित गोंधे या सहा जणांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरेश सारंगधर भागवत (रा. नांदूर खंदरमाळ, ता संगमनेर) या शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री साडेआरच्या सुमारास फिर्यादी सुरेश भागवत यांचे नातेवाईक असलेले ऋषिकेश करंजेकर यांच्या मोबाइलवर तेजस रेपाळे याने फोन केला.

करंजेकर यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांचे घर जाळण्याची व गाव पेटून नेण्याची धमकी दिली. तसेच तू वाहनचालक असून तू आळेफाट्याला आल्यास तुझी गाडी पेटवून देत ठार मारू, अशीही धमकीही दिली.

तसेच भागवत यांचे नातेवाईक वैभव करंजेकर यांच्या मोबाइलवर फोन करून रवी डावखर (रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) याने धमकी दिली. आम्ही ३० ते ३५ जण गँगवॉरमधील असून तुझ्या घराकडे येतो आहे. तुझ्या घराचा पत्ता सांग, तू पत्ता सांगितला नाहीतर तुमचे संपूर्ण गाव पेटवून देऊ, अशीही धमकी देण्यात आली.

नांदूर खंदरमाळ येथील विकास करंजेकर, बाळकृष्ण भागवत हे गावातील गवळी बाबा देवस्थान येथे नैवेद्य ठेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे २५ ते ३० जण हातात लाठ्या, काठ्या व तलवार घेऊन उभे होते. रवी डावखर याच्या हातात तलवार होती. तेजस रेपाळ याच्या हातात गावठी कट्टा होता.

विशाल गोंधे हॉकीस्टिक, प्रदीप आवारी याच्या हातात लोखंडी गज, ओंकार वाकचौरे याच्याकडे तलवार होती. अभिजित गोंधे याच्याकडे लाकडी दांडा होता. त्यांनी विकास करजेकर, बाळकृष्ण भागवत यांना संपवून टाकू, अशी धमकी दिली. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर अधिक तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe