Ahmednagar News : अहमदनगरमधील वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार, एक जखमी

Pragati
Published:
accident

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. तर चौथ्या एका घटनेत एक व्यक्ती अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

विविध अपघातांमधील राहुल बापूसाहेब खरणार, (वय ४६), नंदुबाई तुळशीदास जाधव (वय ४८) , समीर मोहंमद शेख (वय ३४) अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. तुळशीदास भिवराव जाधव (वय ६०) हे गंभीररित्या जखमी आहेत.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास मढी बुद्रुक येथील राहुल बापूसाहेब खरणार (वय ४२) यांना त्यांच्या घरात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ शिर्डी येथील श्री साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती अनिल यादव खरणार (रा. मढी बु., ता. कोपरगाव) यांनी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार जी. एस. वांढेकर करीत आहेत.

दुसरी घटना नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथून तुळशीदास भीवराव जाधव हे त्यांची पत्नी नंदूबाई जाधव यांच्यासोबत दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने येत होते. येसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. यात नंदूबाई जाधव (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला,

तर तुळशिदास भीमराव जाधव हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी राहुल साहेबराव जावळे यांनी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यावरून ट्रकच्या (आरजे ०९-जीडी Y929) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटना स्थळावरून ट्रक चालक पसार झाला आहे.

तिसऱ्या घटनेत कोळपेवाडीकडून समीर मोहम्मद शेख (वय ३४, रा. कोळगाव थडी) हा कोपरगावकडे दुचाकीवरून (एमएच १७-सीडब्ल्यू ४७६०) येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात समीर शेख यांचा मृत्यू झाला. ही घटना धारणगाव शिवारातील रणशूर स्मारकासमोर घडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe