Ahmednagar News : उद्या अर्थात १० मे ला अक्षयतृतीया आहे. हा हिंदू परंपरेमधील एक महत्वपूर्ण सण. या सणाच्या पूजेसाठी केळी कऱ्हे लागतात. परंतु यंदा वाढत्या महागाईचा फटका केळी कर्ह्यांनाही बसला आहे. पोयटा माती व लाकुड महागल्याने ही भाव वाढ झालीये.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मातीच्या केळीत २० रुपये व कह्याच्या बाजार भावात १० रुपयाने वाढ झाली आहे. अक्षयतृतीया व मातीचे केळी, कऱ्हे हे पारंपरिक समिकरण आहे. पूर्वजांच्या स्मरणार्थ पाण्याने भरलेल्या केळी व कह्याची आंबा, खरबूज या फळांनी पूजा करून उपासकरूंना भोजन देण्याची परंपरा आहे.
आई-वडिलांचा स्वर्गवास झाल्यास केळी व कह्याचे एकत्रित पूजन केले जात आहे. अक्षयतृतीया निमित्त तालुक्यातील राहुरी, खडांबे, मानोरी, मांजरी, वांबोरी भागातील कुंभार समाजाचे कारागीर मातीचे केळी व कह्याचे पाच हजार पेक्षा जास्त नग घेऊन विक्रीसाठी राहुरीच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
मागील वर्षी मातीच्या एक केळीला ८० रुपये, तर कऱ्हा २० रुपये बाजारभाव मिळाला होता. यावर्षी केळी १०० रुपये, तर कऱ्हा ३० रुपये बाजारभावाने विक्री होत आहे. अक्षयतृतीयानिमित्त मार्च महिन्यात केळी व कऱ्हा तयार करण्याचे काम कुभांर समाजातील कारागिराकडून सुरू होते. पोयटा माती, खळगा, लिद मिश्रणपासून चाकावर तयार होणाऱ्या कच्या केळी व कऱ्हाला लाकूड व भुशात भट्टी लावली जाते.
१ दिवसात केळी व कह्याचे ५० नग तयार होत असल्याचा कुभांर समाजातील कारागिराचा अनुभव आहे. मागील वर्षी केळीचा प्रतिनग ८० रुपये व कऱ्हा प्रतिनग २० रुपये बाजारभाव मिळाला. यंदा माती व लाकूड महाग झाल्याने केळी १०० रुपये प्रतिनग, तर कऱ्हा ३० रुपये प्रतिनग बाजारभाव झाला, अशी माहिती कुंभार समाजाचे कारागीर देतायत.