आज नगरमध्ये थर’थराट ! गोविंदा सज्ज, १५९ ठिकाणी दहीहंडी, २१ मंडळांचा सहभाग, पहा..

आज गोपाळकाला. गोविंदांसाठी आनंदाची पर्वणी. आज नगर शहरात गोविंदांच्या दहीहंडीचा थरार रंगणार आहे. यासाठी शेकडो गोविंदांनी तयारी केली आहे. हजारोंची बक्षिसे असणार आहेत.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : थरांची स्पर्धा… बक्षिसांची लयलूट… सिने कलाकारांची हजेरी आणि गोविंदांचा टिपेला जाणारा उत्साह असा थरांचा थरथराट दरवर्षीप्रमाणे यंदाही अहमदनगरमधील दहीहंडी उत्सवात पाहायला मिळणार आहे.

आज गोपाळकाला. गोविंदांसाठी आनंदाची पर्वणी. आज नगर शहरात गोविंदांच्या दहीहंडीचा थरार रंगणार आहे. यासाठी शेकडो गोविंदांनी तयारी केली आहे. हजारोंची बक्षिसे असणार आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात लहान मोठ्या १५९ मंडळांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच शहरात आज मोठमोठे सेलिब्रेटी देखील येणार आहेत. त्यामुळे हा उत्साह जास्त द्विगुणित होणार आहे. दहीहंडीसाठी दीड हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर शहरात लहान-मोठ्या २१ मंडळांचा समावेश असून, गोविंदांसाठी मोठमोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

शहरासह जिल्ह्यात मंडळांकडून दहीहंडीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. शहरासह उपनगरांत दहीहंडीच्या आयोजनाचे जाहिरात फलक लागले आहेत. विविध मंडळांकडून सेलिब्रिटींच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

असा आहे बंदोबस्त
२ अपर पोलिस अधीक्षक
९०० होमगार्ड
६ प्लाटून राज्य राखीव दल

३ पथके दंगलविरोधी पथक
४ पोलिस उपअधीक्षक
२१ पोलिस निरीक्षक

या मंडळांकडून दहीहंडीचे आयोजन
• प्रेरणा प्रतिष्ठान इम्पिरियल चौक
• अजिंक्य युवा प्रतिष्ठान – सावेडी
• वर्चस्व मंडळ कोंड्यामामा चौक
• भारत सहकार मित्रमंडळ – आडतेबाजार

• राधाकृष्ण मंदिर – तोफखाना
• चंद्रशेखर आझाद मित्रमंडळ – तोफखाना
• भूमिपुत्र प्रतिष्ठान – नेप्तीनाका
• माजी नगराध्यक्ष बाबूराव इंगळे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe