Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या घटना ताजा असतानाच आता आणखी एक अपघाताबाबत वृत्त आले आहे. दुचाकीवरील पती पत्नीला ट्रकने उडवले असून यात पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीररित्या जखमी आहे.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच फाटा बसस्थानक परिसरात हा भीषण अपघात झाला. जखमीस संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परिगाबाई गंगाधर पवार असे मयत महिलेचे नाव आहे, तर गंगाधर लक्ष्मण पवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
दोघे ही कोपरगाव तालुक्यातील घारी येथील रहिवासी आहे. सदर घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील डाऊच बसस्थानक शिवारात गुरुवार ३० मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगाधर लक्ष्मण पवार व परिगाबाई गंगाधर पवार हे दोघे दुचाकीवरून पुणतांबा फाट्याकडून घारी गावाकडे जात होते.
डाऊच फाटा येथे गॅस वाहतूक करणारा ट्रक न. एम. एच २० ई एल ००१० याने पवार यांच्या दुचाकीस पाठीमागुन जोराची धडक दिली. यात परिगाबाई पवार या मयत झाल्या आहे तर गंगाधर पवार हे जखमी झाले आहे.
या अपघात प्रकरणी अनिल संपत पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रक चालक संतोष रघुनाथ कुहिले रा. जरूळ ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे. घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.