अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामाऱ्या, तिघे जखमी , दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून दोन गटांत जबर हाणामारी झाल्याची घटना घटना घडलीये. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी कोपरगाव बसस्थानक परिसरात झाली.

अझर शेख, राजू डगळे, इरफान शेख, फैजल सय्यद व इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. नयन संजय मेहरे (वय २७, रा. गांधीनगर, कोपरगाव) यांनी फिर्याद दिली. सनी पंडोरे, सनी डिंबर, ऋषिकेश सावंत या जखमींना शिर्डी सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजते.

घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी कोपरगाव बसस्टॅण्डजवळ नयन संजय मेहरे व आझर शेख यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून वाद झाले. काही वेळातच दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी आझर शेख, राजू डगळे, इरफान शेख, फैजल सय्यद आणि इतर तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत नयन मेहरे, सनी पंडोरे, सनी डिंबर व ऋषिकेश सावंत हे जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, याप्रकरणी नयन मेहरे यांच्या फिर्यादीवरून वरील सात जणांविरुद्ध सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल डी. आर. तिकोने करीत आहेत.

कोपरगाव शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत. त्यातून सोमवारी अवैध धंदे करणाऱ्या गुंडांनी निष्पाप तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. बसस्टॅण्ड शेजारील परिसरात जुगार अड्डे चालतात. या ठिकाणी गुंडांचे वास्तव्य असते. येथील अवैध धंदे बंद करावेत, अशा मागणीचे निवेदन शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने पोलिस उपाधीक्षकांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर नीलेश धुमाळ, भरत मोरे, दादा शेवाळे, बालाजी गोर्डे, मनोज कपोते, कृष्णा वडगावकर, श्रीकांत जाधव, सचिन सूर्यवंशी, विकी गायकवाड, रवी जाधव, गणेश महाले, रमेश भाबड, नयन शिंदे, सत्यम पासवान, विकी जोशी आर्दीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ahmednagarlive24 Office