अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : गावात दोन साधू आले, आशीर्वाद देतो म्हणत महिलेला लुटले, अहमदनगरमधील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी तुम्हाला आशीर्वाद देतो, असे म्हणून महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी टेलरिंग काम करणारी ३८ वर्षीय आशा राजेश बोरुडे (रा. वामनभाऊ नगर) या महिलेने पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी दुपारी शेवगाव रस्त्यावरील एका दुकानात आशा बोरुडे असताना दोन इसम साधूच्या वेशात दुकानासमोर आले. त्यातील एक जण दुकानात भिक्षा मागण्यासाठी आला. बोरुडे यांनी साधू वेशात आलेला भामट्याला पाच रुपये दक्षिणा दिली.

त्यानंतर त्या भामट्याने बोरुडे यांना थांबवून म्हणाला की, मी तुला अशीर्वाद देतो. असे म्हणून बोरुडे यांना हातात काहीतरी मुंगी येण्यासारखे औषध देवुन ते फुकण्यास सांगितले. त्यानंतर भामट्या साधूने बोरुडे यांना आणखी पैसे मागितले.

आशा बोरुडे यांनी त्याला पन्नास रुपये दिल्यानंतर बोरुडे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व श्री नाव असलेले सोन्याचे बारा ग्रॅमचे पेंडल ते काढून दे असे सांगितले. ते काढता येत नाही असे बोरुडे यांनी सांगितले. ते फक्त काढून दाखवा, असे इसमाने सांगितले.

तेव्हा आशा बोरुडे यांनी गळ्यातुन सोन्याचे दागिने काढुन दिले. त्यानंतर साधूच्या वेशात आलेला भामटा बाहेर निघुन गेला. त्यानंतर काही वेळानंतर घडला प्रकार आशा बोरुडे यांच्या लक्षात आला. तोपर्यंत हे दोन साधूच्या वेशात आलेले भामटे निघून गेले.

शेवगाव रस्ता परिसरात अनेक ठिकाणी हे भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चोरटे भामटे लोक नेहमीच फसवणुकीसाठी, लुबाडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलम्ब करत असतात. आता हे लोक लोकांच्या भोळेभाबडया स्वभावाचा, भाविकतेचा चुकीचा उपयोग करत लुटत असल्याचे समोर आले आहे.

Ahmednagarlive24 Office