अहमदनगर बातम्या

दोन वाहनांचा अहमदनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप खाली दबून मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अपघातासंदर्भात एक मोठी बातमी आली आहे. दोन वाहनांच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. नगर-सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपासजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी कोकणगावजवळील बायपास नजीक पंक्चर झालेला पिक-अप (एमएच-१६ सीडी ५४३१) थांबला होता. टायर खोलण्यासाठी चालक मयूर भगवान मोरे (वय अंदाजे ३०, रा. जामखेड, जि. अहमदनगर) रस्त्यावर

आला तेव्हा मिरजगावच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच १८ बीजी १३८०) पिकपला जोरात धडक दिली. त्यामुळे पिक-अप उलटला. त्याच्या खाली सापडून मयूर मोरे जागीच ठार झाला. धडक एवढी जोराची होती, की टेम्पोही उलटला.

अपघाताची माहिती समजताच मिरजगावचे सामाजिक कार्यकर्ते सोनू बागवान, तसेच जीवनज्योती रुग्णवाहिकेचे लहू बावडकर यांनी मयूरला तातडीने दवाखान्यात हलविले, पण वाचविण्यात यश आले नाही.

या दोघांनी मिरजगाव पोलीस ठाण्याला कळविल्यावर पोलीस कॉन्स्टेबल रोकडे व पळशी यांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरही भीषण अपघात
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समजली आहे. दौंड तालुक्यातील मळद येथे भरधाव स्पीडने आलेल्या लक्झरीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघत घडलाय.

या घटनेत दुचाकीवरील पती- पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता घडला. गंगाधर यादव व सुमन यादव असे अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office