अहमदनगर बातम्या

विठूरायाची ओढ ! अहमदनगरमधील चौघे अवघ्या चारच दिवसांत २१० किमी अंतर पार करत पंढरपुरात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांचा विठुरायाच्या भेटीचा सोहळा. तब्बल ८०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आषाढी वारीला आहे. लाखो वारकरी २५० किलोमीटर अंतर ठराविक दिवसात पार केले जाते.

या वारीमुळे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध झालेले आहे. मात्र, पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी येथील चौघांनी वारीचे २१० किमीचे अंतर अवघ्या चार दिवसांत पूर्ण केले आहे.

जयसिंग मापारी, सुनील मापारी, ज्ञानेश्वर मापारी, एकनाथ भालेकर, सुभाष गाजरे अशी वारकऱ्यांची नावे आहेत. बुधवारी (दि. ३) सकाळी ८ वाजता हडपसर, पुणे येथून सुरू झालेली ही पायीवारी जेजुरी (पुणे), काळज (सातारा), मोरोची (सोलापूर),

वेळापूर (सोलापूर) असा प्रवास करत पंढरपूरमध्ये रविवारी (दि. ७) दुपारी पांडुरंगाच्या दरबारात पोहोचली. तर सुभाष गाजरे यांनी पुणे ते नीरा असे जवळपास १०० किमीचे अंतर पूर्ण केले. मात्र, तब्येतीच्या अस्वास्थतेमुळे त्यांना पुढील वारी पूर्ण करता आली नाही. २

०२३ साली जयसिंग मापारी यांनी मोठ्या बहिणीसोबत पायी वारी केली असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांनाच झाला.

पुणे ते पंढरपूर हे जवळपास २१० किमीचे अंतर चार दिवसांत चालत पूर्ण करण्याचा संकल्प केला होता आणि या सर्वांनी हा संकल्प पूर्ण केला याचा विशेष आनंद असल्याचे सुभाष गाजरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर पायी वारी ही फक्त पुणे ते पंढरपूर स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या वारीच्या लाखो वर्षांच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन स्वतःच स्वतःच्या शारीरिक क्षमतांना दिलेलं आव्हान आहे. हे चालणे वारीएवढंच स्वर्ग सुख देणारे असल्याचे सुनील मापारी यांनी सांगितले.

२१० किमीची पायी वारी पूर्ण करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक आणि भावनिक क्षमतेचा कस लागतो असे एकनाथ भालेकर यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office