Ahmednagar News : नगर मधील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात रक्तमिश्रित लाल पाणी साचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने महापालिकेला याची कल्पना देण्यात आली.
मागील काही दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे कार्यालय प्रशासनाकडून मनपाला कळवले. त्यानंतर मनपाने धावपळ करत उड्डाणपुलाखाली तुंबलेले ड्रेनेज जेटींग मशिनच्या साहाय्याने साफ करून प्रश्न मार्गी लावला.
झेंडीगेट, बाबा बंगाली परिसरातील अवैध कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी याच परिसरातील गटारीमधून वाहते. यात अनेकवेळा प्राण्यांचे अवशेषही टाकले जात असल्याने ड्रेनेज, गटारी तुंबून समस्या निर्माण होते.
सोमवारी सकाळी मुलींच्या वसतिगृहात रक्तमिश्रित लाल पाणी साचल्याचे समोर आले. वसतिगृह व्यवस्थापनाने महापालिकेला याची माहिती दिल्यावर महापालिकेच्या बांधकाम व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
सोमवारी सकाळीही मुलींच्या वसतिगृहात रक्तमिश्रित लाल पाणी साचल्याचे समोर आले. वसतिगृह व्यवस्थापनाने महापालिकेला याची माहिती दिल्यावर उड्डाणपुलाच्या खाली असलेले ड्रेनेज व गटार तुंबल्यामुळे हे पाणी वसतीगृहात साचल्याचे लक्षात येताच महापालिकेने जेटिंग मशिनच्या सहाय्याने गटार साफ करून प्रवाह मोकळा केला.
जनावरांचे टाकाऊ अवयव
उड्डाणपुलाच्या खाली असलेले ड्रेनेज व गटार तुंबल्यामुळे हे पाणी वसतिगृहात साचल्याचे लक्षात आले. महापालिकेने जेटिंग मशिनच्या सहाय्याने गटार साफ करून प्रवाह मोकळा केला. दरम्यान, या प्रवाहात कत्तलखान्यातील जनावरांचे टाकाऊ अवयवही असल्याचे निदर्शनास आले. प्रवाह मोकळा करण्यात आल्यानंतर दुपारच्या सुमारास साचलेले पाणी वाहून गेले.