Ahmednagar News : ‘पाण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आणि ते मिळवणारच’ ; पारनेरकरांनी केला निर्धार

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अनेक मोठमोठी व अशक्य वाटणारी कामे जनतेचा रेटा व राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण झाली आहेत. असाच आशिया खंडातील सर्वात मोठा असणारा टेंभु उपसा सिंचन प्रकल्प देखील राजकीय इच्छाशक्ती व जनतेचा रेटा यामुळेच मार्गी लागला आहे.

या प्रकल्पातून तब्बल २२ टीएमसी पाणी वितरीत करण्यात येत आहे. त्या तुलनेत आपल्या तालुक्यातील पाण्याची मागणी केवळ एक टीएमसी आहे. जर जनतेचा रेटा व राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर हा एवढा मोठा प्रकल्प मार्गी लागू शकतो तर आपला का नाही. त्यामुळे पाण्याकरिता आम्ही संघर्ष करणार आणि ते मिळवणारच, असा निर्धार पारनेरकरांनी टेंभु प्रकल्पावर केला.

कऱ्हाड तालुक्यातील टेंभु येथील टेंभु उपसा सिंचन प्रकल्पास विश्वनाथ कोरडे यांच्या पुढाकारातुन अजंना फाउंडेशनमार्फत पारनेर तालुक्यातील पठार भागावरील कान्हुर पठार, पिंपरी पठार, वेसदरे, विरोली, पिंपळगाव तुर्क, वडगाव दर्या, अक्कलवाडी, टाकळी ढोकेश्वर यांसह ३८ गावांमधील ३०० शेतकऱ्यांना हा प्रकल्प पाहण्यासाठी नेण्यात आले होते.

त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुपे औद्योगिक वसाहतीत रोजगार निर्माण झाला असून, निघोज पट्टा बागायत आहे. आता उर्वरित दुष्काळी गावांच्या पाण्याच्या मागणीसाठी आम्ही सर्व संघर्ष करणार आहोत. ही गावे याबाबतीत नकारात्मक विचार करत होते तो आज दुर झाला आहे. यापुढे योजनेसंदर्भातील टप्प्यानुसार सरकारकडे मागणी करणार आहोत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या योजनेकरीता अनुकूलता असल्याचे देखील नागरिकांनी सांगितले. यावेळी गरुड यांनी या १९९५ रोजी प्रकल्पाचे भुमिपूजन ते ३० वर्षांचा टेंभु योजनेचा इतिहास संघर्ष व यशाचे टप्पे विषद केले. याबरोबरच नदीजवळील पंप हाऊस, पाणी वितरण करण्यात येणारी प्रक्रिया, वितरीत परीसराची माहिती शेतकऱ्यांना दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe