Ahmednagar News : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी परिसरातील एका १९ वर्षीय तरुणीचे काहींनी रविवारी घारगाव बसस्थानक परिसरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
घारगाव पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची नोंद केली आहे. या प्रकारामुळे दोन समाजात तणाव निर्माण झाला आहे. हिंदूत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलनाचा दिला आहे.
याप्रकरणी शादाब रशीद तांबोळी याने लाहिर शेख, जावेद शेख, कुणाल विठ्ठल शिरोळे यांच्या मदतीने संघटितपणे तिचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मदत केली आहे, असा आरोप हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पठार भागात गुन्हेगारी बोकाळली आहे. काही तरुण सर्रास गावठी कट्टे वापरतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. अपहृत तरुणीचा त्वरित शोध घेऊन, अपहरणकर्त्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पो. नि. संतोष खेडकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात दिलेल्या निवेदनाव्दारे अपहरणकर्त्या तरूणासह त्यास साथ देणाऱ्यांना दोन दिवसात अटक करून कठोर कारवाई करावी. दोन दिवसांत मुलीचा शोध लावून तिला पालकांच्या ताब्यात द्यावे.
तसे न झाल्यास पठार भागातील सकल हिंदू समाज जनआक्रोष मोर्चा काढेल, असा इशारा देण्यात आला आहे. पठार भागातील आंबी परिसरातील ही तरुणी सध्या एका वसतिगृहात राहते.
ती शाळेतून घरी परतली नसल्याने १९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद घारगाव पोलिसांनी केली. दरम्यान मुलीचे शादाब रशीद तांबोळी याने लाहीर शेख, जावेद शेख, कुणाल विठ्ठल शिरोळे यांच्या मदतीने संघटितपणे अपहरण केले असून, त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मदत केल्याचा आरोप हिंदू समाजाने पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.