Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? ‘या’ ठिकाणी ७ दिवसात ३ मृतदेह सापडले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. अनेक खुनासारख्या घटनाही जिल्ह्यात अनेकदा घडत असल्याचे चित्र आहे. पोलीस या गुन्ह्यांचा छडा लावत असल्याचे दिसते.

परंतु गुन्हेगारी वृत्तीस संपूर्णपणे आळा बसलेला दिसून येत नाही. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात गेल्या ७ दिवसात तीन मृतदेह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नुकताच रायते गावातील चौफुलीजवळ एका विहीरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पठारभागातील वरूडी पठार येथे सात दिवसांपूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. अजनूही त्याची ओळख पटलेली नसून घारगाव पालीस तपास करीत आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी साकूर येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता.

मात्र, त्याची ओळख पटलेली आहे. आता पुन्हा रायते गावातील एका विहीरीत अंदाजे ३५ ते ४० वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगात काळया रंगाचा सदरा असून त्यावर लाल रंगाच्या चौकटी दिसत आहे.

तसेच निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खुनाच्या घटना घडणे हे चिंताजनक
अहमदनगर जिल्हा हा शांत व संयमी म्हणून ओळखला जातो. गुन्हेगारी होती पण अगदी सर्रास मर्डर होत नव्हते. दरम्यान मागील काही दिवसांचा अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर अहमदनगर जिल्ह्यात अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत.

शहरी भागासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक घटना घडल्या आहेत. खुनाच्या घटनांमध्ये वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. पोलिसांनी तातडीने यावर उपाययोजना करत गुन्हेगारांवर वचक बसवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe