Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसतायेत. जिल्ह्यातील दोन घटना समोर आल्या असून एका घटनेत पतीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून पत्नीसह मुलावर केला वार केल्याची घटना घडली आहे.
तर दुसऱ्या घटनेत एका १९ वर्षाच्या युवकाने ३० वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून आरोपी पतीने पत्नीला चाकूने सप्पासप वार करून जखमी केले आहे.
हा प्रकार १४ जूलै २०२४ रोजी राहुरी तालूक्यातील वांबोरी येथे घडली आहे. या घटनेतील ४५ वर्षीय महिला ही राहुरी तालूक्यातील खंडाबे खुर्द येथील रहिवाशी असून सध्या त्या वांबोरी येथे राहतात. त्यांचा पती त्यांना नेहमीच दारु पिउन घरगुती कारणावरुन मारहाण करत असतो.
दि. १४ जूलै २०२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पत्नी घरात असताना आरोपी पती दारु पिऊन घरी आला व पत्नीवर संशय घेऊन शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहाण केली.
तसेच पत्नीवर चाकूने वार करून मुलाला कुंदळीच्या दांड्याने मारहाण केली. आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर पत्नीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
दुसऱ्या घटनेत १९ वर्षाच्या युवकाने ३० वर्षाच्या विवाहितेवर बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली. केलेली चॅटिंग पतीला पाठविण्याची व आत्महत्या करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार त्याने केला.
नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी (१७ जुलै) एमआयडीसी पोलिसांत सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदर पीडित विवाहितेसोबत हेमंत सैनी याचा परिचय होता.
यातूनच त्यांनी सोशल मीडियावर चॅटिंग देखील केली. हे चॅटिंग पतीला पाठविण्याची व आत्महत्या करण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला अशी माहिती समजली आहे.