Ahmednagar News : सामूहिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक काळिमा फासणारी घटना, अहमदनगर हादरले

Pragati
Published:
atyachar

Ahmednagar News : श्रीरामपुरातील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपुरातून आणखी एक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. श्रीरामपूर मधील एका परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद देठे असे आरोपीचे नाव आहे. श्रीरामपूर शहरात या प्रकरणातील २० वर्षीय आरोपी राहतो. पिण्याचे पाणी भरण्यासाठी लागणारी मोटार ही अल्पवयीन मुलीच्या घरी वापरायला दिलेली होती.

ही पाण्याची दिलेली मोटार परत घेण्यासाठी हा आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरी गेला. तेव्हा घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने सदर मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद देठे नावाच्या तरुणावर भा. दं. वि. कलम ३७६ सह पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. श्रीरामपूर मध्ये नुकतीच सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. एका कॅफेत सदर मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. आता लागोपाठ दुसरी घटना घडली आहे.

अत्याचारासारख्या घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब बसेल अशी कारवाई करावी, अशी मागणी श्रीरामपूरकर करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe