Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पळवून नेण्याच्या प्रयत्नाच्या घटना उघडकीस येत आहेत. नगर जिल्ह्यातील पिंपळगाव उजणी येथील मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नांची घटना ताजी असतानाच आता मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे हा प्रकार घडलाय. येथील शाळेत जाणाऱ्या एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न दोघांनी केलाय. परंतु ते नागरिकांच्या हाती लागले, त्यानंतर ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षे वयाच्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. ग्रामस्थांनी अस्लम अजमेर पठाण व शरीफखान मस्तानखान पठाण या दोघाना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपींविरुद्ध मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत उत्तम विष्णू निकम यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मुलगा शाळेत जात असताना मोटार सायकलवरून आलेल्याआमच्या सोबत गाडीवर बस, आम्ही तुला शाळेत सोडून देतो असे म्हणाले. मुलाने घटनास्थळावरून धूम ठोकली. थोड्यावेळाने मुलगा पुन्हा दप्तर घेऊन शाळेत जाण्यास निघाला.
वरील आरोपी त्याच्यासमोर परत आले त्यांना पाहताच मुलाने पुन्हा धूम ठोकली.पुन्हा त्याच महिलेच्या घरात घुसला व सर्व प्रकार सांगितला. महिलेच्या मुलाने निकम यांना फोन करून घटना सांगितली. फिर्यादी व काही ग्रामस्थांनी आरोपींना पकडले.
त्यांची त्यांची नावे अस्लम अजमेर पठाण व शरीफखान मस्तानखान पठाण (रा. कठोरा बाजार ता. भोकरदन, जि. जालना) असे सांगितले. ग्रामस्थांनी दोन्ही आरोपींना चांगला चोप दिल्याचे समजते.
दोन्ही आरोपी व त्यांची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली. आरोपींकडे दुचाकीच्या डिकीत लाकडी दांडे, करवती, कटावणी असे साहित्य मिळून आले.