अहमदनगर बातम्या

विवाहितेवर जीपमधील दुष्कृत्याची घटना ताजी असतानाच यात्रेत आलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार, अहमदनगरमध्ये खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत चालेल्या आहेत. जिल्ह्यातून अलीकडील काही काळात अशा घटना सातत्याने समोर आल्याचे दिसते.

आता नुकतीच श्रीरामपूर शहरातील ३५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिच्यावर काळ्या-पिवळी जीपमध्ये अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हरेगाव येथील यात्रेसाठी आलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील

२१ वर्षीय विद्यार्थीनी सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे यात्रेनिमित्त आली होती. तेव्हा शिर्डी येथे बस स्थानकावर ओळख झालेला दिनेश बाळासाहेब जाधव, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर याने विद्यार्थीनीस गोड बोलून तुझ्याशी लग्न करील,

रात्र फार झाली आहे, असे म्हणत घरी नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच दिनेशने या विद्यार्थीनीवर शिर्डीतील हॉटेलमध्येही नेवून अत्याचार करत अश्लिल फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली.

या प्रकरणी राहाता तालुक्यातील पीडित विद्यार्थीनीने श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी दिनेश बाळासाहेब जाधव याच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. श्रीरामपूर शहर व तालुक्यात लागोपाठ अत्याराच्या दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत चालेल्या आहेत. जिल्ह्यातून अलीकडील काही काळात अशा घटना सातत्याने समोर आल्याचे दिसते.

Ahmednagarlive24 Office