अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अपघातात महिलेचा मृत्यू, पण तिथे चपलाच नव्हत्या.. मग सुरु झाला उलट तपास, तिच्यासोबत दिवसभर खुन्याने जे जे केलं ते समोर आलं अन पोलिसांनाही घाम फुटला…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मृतावस्थेत महिला आढळली.. तिचा अपघातात मृत्यू झाला होता.. पण अपघातस्थळी मृतदेहाजवळ कुठेही चपला नव्हत्या.. मग सुरु झाला उलट तपास.. तिच्यासोबत दिवसभरात जे जे झालं ते समोर आलं अन सगळेच अवाक झाले.

संगमनेर शहरालगत कासारवाडी परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचा तिच्या प्रियकरानेच खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. रंजना शिवाजी खेमनर (वय ३५, रा. अंभोरे) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी बाळासाहेब बिरू हळनर यास ताब्यात घेतले आहे.

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले, की संबंधित महिला (वय ३५) शुक्रवारी सासूच्या डोळ्यांवर उपचारासाठी शुक्रवारी संगमनेरला रुग्णालयात आली होती. सायंकाळी डबा आणण्यासाठी बाहेर गेली मात्र रात्री रुग्णालयात परतली नव्हती.

दरम्यान, संगमनेर पोलिसांना बाह्यवळण मार्गावर कासारवाडी शिवारात तिचा मृतदेह सापडला. सुरवातीला शहर पोलिसांनी अपघात गृहित धरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यात पोलिसांनी तिच्या गावातीलच बाळासाहेब बिरू हळणर याला ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलगडा झाला.

ती दवाखान्यातून बाहेर पडली, तेव्हा बाळासाहेब याने तिला दुचाकीवरून चंदनापुरी घाटात नेले. तेथे निर्जनस्थळी गप्पा सुरू असताना तिचे डोके दगडावर आपटले. त्यातच तिचा मृत्यू झाला. मृतदेह तेथेच लपवून तो घरी गेला. दुचाकी घरी ठेवून चारचाकी मोटार घटनास्थळी नेली. बाह्यवळण मार्गावरील कासारवाडी गावच्या शिवारात मृतदेह आणून त्यावरून मोटार नेली, जेणेकरून तो अपघात वाटावा.

पण घटनास्थळी तिच्या चपला नव्हत्या. अपघातस्थळी मृतदेहाजवळ कुठेही खेमनर यांच्या चपला आणि त्यांचा मोबाइल आढळून आला नाही. रंजना खेमनर आणि त्यांच्या गावातील बाळासाहेब हळनर यांच्यात मोबाइलद्वारे संभाषण झाले होते.

दवाखान्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती मोटारसायकलवर बसून जाताना दिसली. तो धागा पकडून पोलिसांनी तपास केला आणि बाळासाहेब हळनरला ताब्यात घेतले आणि त्याने खून केल्याची कबुली दिली.

Ahmednagarlive24 Office