Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस जोरदार पडला. मृग नक्षत्र व इतर नक्षत्रांचाही पाऊस चांगला पडला. त्यामुळे पेरण्याही चांगल्या झाल्या.
परंतु आता ही पिके विविध रोगांनी धोक्यात आले आहेत. रिमझिम पाऊस सुरु असल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकावर होत आहे. सध्या मूग पिकावर यलो मोॉक रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर तालुक्यात सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मूग, सोयाबीन, बाजरी, उडीद, मका व इतर चारा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण,
हवेतील गारवा अन् रिमझिम पडणारा पाऊस यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. माग आठ दिवसांपासून ऊन पडत नसल्याने मुगाची पाने पूर्णपणे पिवळी पडली आहेत.
तसेच फुलांचीदेखील गळती होत आहे. यलो मोडॉक हा रोग मुगावर दिसून येत आहे. पूर्णपणे पिवळी पडलेली पाने उत्पन्नावर परिणाम करणार आहेत. फवारणी करूनही रोगराई नष्ट करता येत नाही अशी स्थिती सध्या आहे.
काही भागात शेतकऱ्यांनी यंदा वाटाण्याचे उत्पादन घेतेले आहे. मात्र, सध्या वाटाण्याची मातोमोल भावाने विक्री केली जात आहे. काही दिवसापूर्वी हाच भाव दीडशे रुपयांपुढे गेला होता.
मालाची गुणवत्ता नसल्याने भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. वाटण्यात कोट्यवधींचा जुगार खेळून शेतकऱ्यांनी हाती असलेले भांडवल मातीत घातले असल्याचे चित्र आहे.
जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकरी वाटाणा या पिकाकडे वळले. शेतकऱ्याला पुढील पिकासाठी आर्थिक दृष्ट्या भांडवल वाटाणा, मूग या पिकांतून होत असते.
मात्र, यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादन क्षमता घटली. चाळीस किलोंची वाटाणा बियाणाची बॅग ७ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांनी खरेदी केली.
एका वटाण्याच्या गोणीला उत्पादन खर्च १५ ते २० हजार रुपयांपर्यंत आला. मात्र, त्या तुलनेत भाव ५० ते ६० रुपया किलो रुपये मिळत आहे.