Ahmednagar News : चोरी, दरोडे, छोट्यामोठ्या चोऱ्या आदींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. तसेच जिल्ह्यात अनके ठिकाणी चंदनचोरी होत असल्याच्याही घटना घडत असल्याचे दिसते.
परंतु आता चंदनचोरांनी थेट श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा भेदून जे केलंय ते पाहून आता सर्वसामान्य डोक्याला हात लावतायेत.

त्याच झालं असं की, या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा भेदून त्यामागील बागेतून चंदन झाडांच्या चोरीचा प्रयत्न झालाय. कडक सुरक्षा व्यवस्था भेदून चोरटे आत शिरल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पाचशे रूम परिसरात निवासस्थाने आहेत.
निवासस्थानाच्या परिसरात चंदनाची झाडे आहेत. अत्यंत सुरक्षित असा हा परिसर आहे. सुरक्षा रक्षकांचा तेथे नेहमीच वावर असतो. साईबाबा संस्थान कर्मचारी वगळता बाहेरच्या कोणालाही विनापरवानगी प्रवेश दिला जात नाही. निवासस्थानाभोवती दोन सुरक्षा रक्षक कायम तैनात असतात.
मात्र ही सुरक्षा भेदून रात्री निवासस्थानामागील बागेतील चार पैंकी तीन चंदनाची झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला. दोन झाडे कापली मात्र तिसरे झाड तोडनाची चाहुल लागल्याने चोरटे पसार झाले.
निवासस्थानाजवळ जाण्यासाठी एकच मार्ग असून तेथे नेहमी सुरक्षारक्षक तैनात असतात. निवासस्थानामागे चंदनाची झाडे आहेत. तस्करांनी तार कंपाऊंडच्या तारा दोन ठिकाणी कापून चोरवाट तयार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्याद्वारे बागेत प्रवेश करत चोरीचा प्रयत्न झाला.
दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना वाढलेल्या आहात. ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण जास्त आहे. भर दिवसाही घरफोडीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
आता अधिकऱ्यांच्याच निवासस्थानाच्या परिसरात व सुरक्षा असूनही चोरी होते तर सामान्यजनांचे काय असा मोठा प्रश्न नागरिकांना पडलाय.