Ahmednagar News : धावत्या पिकअपमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू ; बायपासवरील घटना

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Accident News

Ahmednagar News : भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीचा क्लिनर साईडचा दरवाजा अचानक उघडून क्लिनर साईडला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. हि घटना बायपास रस्त्यावरील नगर तालुक्यातील वाळूज गावच्या शिवारात सोमवारी (दि.२७) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. बाळाजी माधव साकटवाड (वय २९, रा. मुखेड, जि. नांदेड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मयत बाळाजी व त्याचा चुलत भाऊ माधव ज्ञानोबा साकटवाड हे दोघे सोमवरी पहाटे पिकअप गाडी घेवून बायपास रस्त्याने जात होते. दरम्यान माधव हा गाडी चालवत होता तर बाळाजी हा क्लिनर साईडला बसलेला होता. हे दोघे वाळूज शिवारातील पुलाखाली आले असता बाळाजी याच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला. अचानक दरवाजा उघडल्यामुळे बेसावध असलेला बाळाजी हा पिकअपमधून थेट खाली रस्त्यावर पडला.

यात तो गंभीर जखमी झाला. त्याला माधव याने तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र, तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. कुलकर्णी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe