अहमदनगर उत्तर

संगमनेरच्या आंबीखालसा फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नुकतेच आंबीखालसा फाटा येथे दुभाजकाजवळ मालवाहू ट्रक उलटला.

यावेळी ट्रकमधील कुटी यंत्राचे साहित्य महामार्गावर अस्ताव्यस्त पसरले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मालवाहू ट्रक हा पंजाब येथून कुटी यंत्रांचे साहित्य घेवून कोल्हापूर येथे जात होता.

दरम्यान रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा ट्रक पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथे आला असता गतिरोधकावर आदळून दुभाजकाजवळ पलटी झाला.

या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या अपघातातही सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. परंतु, ट्रकचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी अपघात टाळण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office