अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे.(Municipal Councils)
यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याआहे. दरम्यान या घेण्यात आलेल्या निर्णयाचा थेट परिणाम जिल्ह्यातील अनेक निवडणुकांवर झाला आहे.
यामुळे नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर राज्य शासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे.
या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील 7 नगरपारिषद तसेच शिर्डी नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असल्याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, गुरूवारपासून हे प्रशासकराज सुरू होणार आहे.
या आहेत सात नगरपरिषदा :-
संगमनेर -प्रांताधिकारी
पाथर्डी – मुख्याधिकारी
राहाता – मुख्याधिकारी
श्रीरामपूर नगरपरिषद- प्रांताधिकारी
शिर्डी – प्रातांधिकारी
कोपरगाव – मुख्याधिकारी
राहुरी – मुख्याधिकारी देवळाली-प्रांताधिकारी