अहमदनगर उत्तर

अहमदनगर जिल्हा विभाजन होवून श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आमदार होण्यापूर्वी मी प्रशासनात काम केले आहे. अहमदनगर हा क्षेत्रफळाने विस्तीर्ण असलेला जिल्हा प्रशासकीय दृष्टिकोनातून गैरसोयीचा आहे. या जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे,

अशी माझी भूमिका असल्याचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले. पावसाळी अधिवेशनात या संबंधात शासनाला विचारणा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे,

कामगार नेते नागेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार लहू कानडे यांची भेट घेऊन श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. श्रीरामपूर येथे अतिरिक्त नगर रचना कार्यालय आणल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार कानडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती म्हणजे जिल्ह्याचे स्थलांतर नाही. नागरिकांसाठी काही सेवा त्या कार्यालयातून दिल्या जाणार आहेत. त्याला विरोध करण्याचे कारण नाही.

मात्र श्रीरामपूर जिल्हा निर्मिती बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी विजय नगरकर, मनोज हासे, अभिजीत बोर्डे, विठ्ठल पवार उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office