Ahmednagar Politics : महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यामध्ये अनेक पक्ष एकत्र आले. वरच्या लेव्हलला जरी हे एकत्र आले तरी स्थानिक लेव्हलला मात्र नेत्यांच्या अडचणी वाढल्या. अनेक ठिकाणी एकमेकांचे वर्षानुवर्षे राजकीय शत्रू असणाऱ्यांना एकमेकांचे काम करावे लागले.
तसेच अनेक ठिकाणी वरचेवर एकत्रितपनाचा आव आणला गेला परंतु एकमेकांची कामे किती केली याबाबत शंका निर्माण झाली. परंतु यामुळे सध्या कोण कोणासोबत आहे हेच लोकांना अद्यापही कळलेलं नाही. दरम्यान आता उत्तरेतही अशीच संभ्रमाची अवस्था लोकांमध्ये निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.
यासह कारण असे की, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना जाहीर पाठींबा देणारे माजी आ. भानुदास मुरकुटे हे दोन दिवसांपूर्वी एका खाजगी कार्यक्रमादरम्यान बराच वेळ महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी गप्पा मारताना दिसले. ज्यांनी हे चित्र पाहीले त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
एका उद्घाटन सोहळया प्रसंगीचा एक फोटो सध्या व्हायरल झाला असून या फोटोमध्ये माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे हे नाष्टा करताना दिसत आहे तर त्यांच्यासमोर माजी आमदार भानुदास मुरकुटे हे गप्पा मारताना दिसत आहे. निवडणुकीदरम्यान कोणाला पाठींबा द्यावा? या संदर्भात निर्णय घेताना मुरकुटे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिर्डीत चर्चा केली होती
आणि त्यानंतर आपल्या समर्थकांची बैठक घेवून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना जाहीर पाठींबा दिला होता. कार्यकर्त्यांमार्फत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात लोखंडेंच्या प्रचारासाठी फिल्डींग लावली होती.
निवडणुकीनंतर अजून निकाल यायचा बाकी आहे खा. भाऊसाहेब वाकचौरे आणि माजी आ. भानुदास मुरकुटे योगायोगाने एकाचवेळी कार्यक्रमाला पोहोचले. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी दोघेही जवळ-जवळ बसले आणि तेथे गप्पांची मैफील जमली. त्यामुळे जनतेमध्ये सध्या याचीच चर्चा सुरु आहे.
सुसंस्कृत राजकारण
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही मोठी आहे. राजकारणात कुणी किती शत्रू असला तरी तो निवडणुकांपुरताच. इतर वेळी प्रत्येकाने एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासावे असे म्हटले जाते. त्यामुळे मुरकुटे-वाकचौरे यांनी एकमेकांशी चर्चा केल्या तरी तो सुसंस्कृत राजकारणाचा एक भाग असावा असे लोक म्हणत आहेत.