Akole News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ अकोले येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर काल रविवारपासून साखळी उपोषण सुरू झाले आहे.
उपोषणास माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिताताई भांगरे यांच्यासह मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
रविवारी सकाळी अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर व जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या साखळी उपोषणास सुरुवात झाली.
माजी आमदार वैभवराव पिचड व अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिताताई भांगरे यांचेसह मुस्लिम समाजाचे शाहिद भाई फारुकी, आरिफ तांबोळी, सलीमखान पठाण, अर्षद तांबोळी यांनीही पाठिंबा दर्शवला व समाज बांधवांशी संवाद साधला.
यावेळी ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आदी उपस्थित होते. आज सोमवारी औरंगपूर, उंचखडक व इंदोरी येथील मराठा समाज साखळी उपोषणात सहभागी होणार आहे.
यावेळी सेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले, तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे, माजी तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय वाकचौरे, संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. संदिप कडलग, सोमनाथ नवले,
मनसेचे तालुकाप्रमुख दत्ता नवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, प्रकाश नाईकवाडी, उपाध्यक्ष माधवराव तिटमे, मराठा सेवा संघाचे दिलीप शेणकर, अमृतसागर दूध संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे,
आप्पासाहेब आवारी, ज्येष्ठ नेते अॅड. वसंतराव मनकर, अॅड. सदानंद पोखरकर, अॅड्य के. बी. हांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कारखान्याचे संचालक परबत नाईकवाडी, अशोकराव देशमुख, विकास शेटे, बजरंग दलाचे नेते भाऊसाहेब चव्हाण, नगर पंचायतचे उपाध्यक्ष शरद नवले,
नगरसेवक नवनाथ शेटे, सुगाव खुर्दचे माजी सरपंच अमोल वैद्य, माजी नगरसेवक सचिन शेटे, परशराम शेळके, औरंगपूरचे उपसरपंच संदेश वाळुंज, केतन भांगरे, बबन वाळुंज, शुभम फापाळे, भाऊसाहेब नाईकवाडी,
बबनराव तिकांडे, सोपानराव देशमुख, बबनराव देशमुख, सुरेश नवले, राहूल शहा, राहुल शेटे, गोरख वाकचौरे, प्रतीक कोटकर, ऋषी देशमुख, संचित कोटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.