लोकसभेला जनतेने राज्यातील ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिले. तुम्ही जिल्ह्यातील दोन्ही खासदार मताधिक्याने विजयी करून देशाला दाखवून दिले, की आता इथे थांबायचे नाही. ७० दिवसांनी विधानसभा निवडणूक आहे. मला जनेतेने ५६ वेळा निवडून दिले आहे. आता एकच मागायचे आहे, महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल. कष्टकरी, शेतकरी, माता बहिणीचा विचार करणारे सरकार आणायचे आहे.
त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार निवडून द्या, असे प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केले. स्व. अशोकराव भांगरे यांच्या ६१व्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळावा राष्ट्रवादीचे नेते खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थित अकोले बाजारतळावर झाला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत होते. याप्रसंगी खा. निलेश लंके, खा. भाऊसाहेब वाकचौरे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव ढवळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या जयश्रीताई बाळासाहेब थोरात, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनिताताई भांगरे, दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदिप वर्षे, काँग्रेसचे नेते जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष राहुल शेटे, संदीप शेनकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
खासदार पवार म्हणाले, देश संकटातून जात आहे. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केंद्र व राज्यातील सरकारला शेती व शेतकऱ्यांविषयी अस्था नाही, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी खा. लंके, डॉ. तांबे, कॉ. ढवळे, अमित भांगरे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, सुनिताताई भांगरे, चंदू घुले, महेश नवले, डॉ. अजित नवले, बी. जे. देशमुख आदींची भाषणे झाली. स्वागत तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, प्रास्तविक विनोद हांडे यांनी केले.
याप्रसंगी सुरेश खांडगे, संदिप शेणकर, अमित नाईकवाडी, भागवत शेटे, दिलीप भांगरे यांच्यासह तालुका व परिसरातील कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.