ग्रामस्थांसह आजी-माजी आमदार उतरले रस्त्यावर ! रखडलेल्या रस्त्यासाठी रास्तारोको आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Akole News : राजूर येथील कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील रखडलेला रस्ता सुरू करावा, या मागणीसाठी राजूर ग्रामस्थांनी दोन तास कोल्हार घोटी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे आजी व माजी आमदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासुन रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू होऊन २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, सरपंच पुष्पाताई निगळे, माजी सरपंच गणपतराव देशमुख, उपसरपंच संतोष बनसोडे, माजी उपसरपंच गोकूळ कानकाटे, विनय सावंत, शेखर वालझाडे, रवींद्र पवार, निलेश साकुरे, हर्षल मुतडक, अतुल पवार, राम बांगर,

रामदास पवार, ओकार नवाळी, दत्तात्रय निगाळे, विनायक माळवे, भिमाशंक कवडे, संदीप पवार, अक्षय देशमुख, रोशन रोकडे, चंद्रकांत वराडे आदी मान्यवरांसह राजूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दशक्रिया घाटापासून ते स्मशान भूमीपर्यंतचा कोल्हार-घोटी मार्गावरील रस्ता वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला आहे. यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार व छोटी मोठी आंदोलने होऊनही या रस्त्याचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता,

त्यामुळे राजूर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सोमवारचा आठवडे बाजार असल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्षे, तुकाराम दहिफळे, तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे उपस्थित होते.

■सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही मला आज आंदोलन करावे लागते. हे दुर्दैवी आहे. २०१९ साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नाने हा रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने मार्गी लागावे व दोन वर्षापासून राजूरकरांना जो त्रास सहन करावा लागला तो यापुढे होणार नाही, याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. -डॉ. किरण लहामटे, आमदार, अकोले

■कोणावरही अन्याय न करता कायद्याच्या चौकटीत राहून सार्वजनिक बांधकाम खात्याने काम करावे. दोन वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे व राजूरच्या ग्रामस्थांना दिलासा द्यावा, हिच माझी प्रामाणिक इच्छा आहे. -वैभवराव पिचड, माजी आमदार