माजी मंत्री शिंदे यांच्या दबावामुळेच भाजपला रामराम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- माजी मंत्री राम शिंदे यांच्या एकतर्फी राजकारणाच्या दबावामुळे दमकोंडी झाल्याने मी राष्ट्रवादीत प्रवेश केला.जामखेड पंचायत समितीच्या पदाचा सभापती पदाचा मान मला मिळाला आहे.

आता तालुक्यातील सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडावेत. अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पंचायत समितीचे सभापती राजश्रीताई मोरे यांचे पती सूर्यकांत मोरे यांनी दिला.

खर्डा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात खर्डा ग्रामस्थांच्याच्यावतीने नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते..यावेळी सूर्यकांत मोरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये मी ३० वर्षांपासून काम करीत होतो.

परंतु माझी घुसमट होत असल्याने मी राष्ट्रवादीत प्रवेश केला.आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन कोणत्याही उपेक्षीताच काम मी प्रामाणिकपणे करणार असून

आपले कार्यालय हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी खुले राहणार असल्याचे ते म्हणाले. माजी सभापती आव्हाड म्हणाले की मी सभापती पदावर काम करत असताना मला अनेक गोष्टींमध्ये टाळले जात होते. त्यामुळे मी भाजपचा त्याग केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24