अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- अकोले नगरपंचायत निवडणूकी साठी भाजपच्या उमेदवारांनी मंत्री वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिकक्य व बहुमताने भाजपचा झेंडा पुन्हा एकदा नगरपंचायत वर फडकविला जाणार असा विश्वास माजी आमदार पिचड यांनी व्यक्त केला.
अकोले नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन पिचड यांचे नेतृत्वाखाली मोठे शक्ती प्रदर्शन करत बहुतांश प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अद्याप जागा वाटप स्पष्ठ झालेले नाही.
कोणत्या पक्षाला कोणता प्रभाग हेही निश्चित झालेले नाही.त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दरम्यान केंद्र व राज्यातील आरपीआय आठवले गटाने अकोलेतही भाजपला पाठिंबा दिला आहे.
अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 21 डिसेंबर 2021 रोजी होत असुन त्यासाठी नामनिर्देशन पत्र ( उमेदवारी अर्ज) भरण्यासाठी आजचा दिवस बाकी राहिला आहे.