अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :- देशभरात कोरोनाचे संकट घोंगावत असताना गेल्या दोन दिवसांपासून श्रीरामपुरात वादळी वारा व अवकाळी पावसाने ३० तासाहून अधिक काळ लाईट गेली होती. त्यामुळे पिण्याचे पाणी सोडण्याची नगरपालिकेची मोठी पंचाईत झाली त्यावेळी नगरसेविका स्नेहल खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी जारचे फिल्टरचे थंडगार पिण्याचे पाणी जवळपास ३०० कुटुंबांना स्वतः घरपोहच दिल्याने सर्वत्र दोघांचे विशेष कौतुक केले जात आहे.
श्रीरामपूरात अशी जनसेवा करत संकटसमयी नागरिकांना घरपोहच पाणी देणाऱ्या स्नेहल खोरे एकमेव नगरसेविका असतील असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संपूर्ण शहरात लाईट नसल्याने पिण्याच्या पाण्याचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून कोलमडले होते.
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यातच थत्ते मैदान जवळील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये असलेला पाणी साठा केतन खोरे यांनी अभियंता मनोज ईश्वरकुट्टी यांचेसह जाऊन पाहणी करत पहिल्या टप्प्यातील निम्म्या प्रभागात वेळेवर पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन केले.
परंतु लाईटच्या लपंडावामुळे तिसऱ्या टप्प्यातील पूर्णवाद नगर, चराच्या पलीकडील नागरी वसाहत, इंद्रप्रस्थ सोसायटी, महादेव मळा परिसरातील २५० ते ३०० कुटुंबांना पिण्याच्या पाणी आले नाही. नगरसेविका स्नेहल व केतन खोरेंनी तातडीने थंड पिण्याचे पाण्याचे जार स्वखर्चाने उपलब्ध करत नागरिकांच्या घरी जाऊन दिले.
प्रत्येक कुटुंबातील सदस्य संख्या विचारात घेऊन दिवसभर पुरेल इतके पाणी तर दिलेच शिवाय नगराध्यक्षा अनुराधा आदिकांशी चर्चा करून सायंकाळी थत्ते मैदान पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून तिसरा पाण्याचा टप्पाही लक्ष घालून पूर्ववत केला.
यावेळी मोरया फाउंडेशनचे महादेव होवाळ, विजय पाटील, गणेश मोरगे, शुभम चोथवे, राजेश पाटील, राजेश थोरात, तेजस पाथरकर, दीपक निकम, रामा भोज, युसूफ पठाण, विजय भंडारी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी नियोजनरित्या घर टू घर पाणी वाटप केले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com