धोकादायक! अहमदनगरमधील ‘त्या’ पुलावर पुन्हा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- शेवगाव- नेवासे या प्रमुख राज्यमार्गावरील ढोरा नदीवर एक पूल आहे. पुलाचे संरक्षक कठडे पूर्णत: तुटले असून दोन्ही बाजूने हा पूल वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे.

या पुलाचे बांधकाम १९७६ मध्ये करण्यात आले होते. हा पूल सद्य स्थितीमध्ये वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून या ठिकाणी योग्य वेळी लक्ष घातले नाही तर या पुलावर पुन्हा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे हा पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या पुलाच्या कठडयांची अवस्था बिकट झाली आहे. पुलाचीही दुरवस्था झालेली आहे. यावरून होणारी जड वाहतुक, प्रवाशी वाहतुक धोकादायक ठरत आहे.

शिवाय नदीला पाणी असल्याने वाहतूकीसाठी पर्यायी रस्ता ही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे.

याबद्दल बोलताना शेवगाव सार्वजनिक बाधकाम विभागाचे शाखा अभियंत्रा ए. आ. कोंगे म्हणाले, पुलाच्या कठडयाच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन वर्षापासून प्रस्ताव मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेला आहे.

मात्र शेवगाव- नेवासे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करण्याचे प्रस्तावित असल्याने त्यात नवीन पुलाच्या बांधकामाचा समावेश असल्याने पुलाच्या दुरस्ती प्रस्तावास मंजूरी मिळालेली नाही असे स्पष्ट केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24