अहमदनगर उत्तर

ह्या कारणामुळे वाढला बिबट्यांचा वावर !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठारभागात ढवळपुरीचे मेंढपाळ मेंढ्यांना चरण्यासाठी कळपासह दाखल झाल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे.(leopards)

यामुळे त्यांचे दर्शन नागरिकांना होत आहे. अवकाळी पावसाने या भागातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने मेंढ्यांना चरण्यासाठी येथे चारा उपलब्ध आहे.

कांदा पिकात घालण्याची परवानगी शेतकरी देत असल्याचे चित्र आहे. पठारातील जवळे बाळेश्वर, सारोळे पठार, सावरगाव घुले तसेच रणखांब पासून ते मामाखेल व जवळेबाळेश्वर पर्यंतचा भाग मेंढ्यांची व्यापला आहे.

मेंढ्यांच्या आगमनाने जंगल भागातील बिबटे बाहेर येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भागात शेती व कुकूट पालनाचे व्यवसाय आहे. प्रत्येकाच्या घरी कोंबड्या पाळल्या जातात.

आधुनमधून बिबटे शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करतात. माणसांवरही हल्ले झाल्याच्या ताज्या घटना आहेत. मेंढपाळांमुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. नागरिक व मेंढपाळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वनपाल रामदास थेटे यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office